PostImage

ऑनलाइन केअर

June 12, 2024   

PostImage

छात्र छात्राएं अपना भविष्य अच्छे विषय का चयन करके बनाये


आज सबसे अधिक ध्यान देने योग्य बातें है जिसमे शिक्षा अच्छी शिक्षा अच्छे विषय चयन कर ही आगे बढ़ना चाहिए, जैसे कि आजकल कुछ विषय की ओर स्टूडेंट्स का ध्यान नही जाता, जैसे लडकिया आजकल गृह विज्ञान विषय होम साइंस , केमिस्ट्री, और लड़के भूगर्भ शास्त्र, भूगोल, आदि विषय कम लेते है जो लेते है वह कम संख्या में होते है और जिन्हें जानकारी है वे लगन से अपनी शिक्षा पूर्ण के जॉब में लग जाते है। उसी तरह तकनीकी शिक्षा, और शैक्षणिक शिक्षा पर विशेष ध्यान देने की आवश्यकता है। इसी प्रकार हम देखें की शिक्षा मैनेजमेंट पर भी होती है मैनेजमेंट के विषय हम सिर्फ काम चलाने के लिए करते हैं किंतु मैनेजमेंट के विषय अच्छे रखें और अच्छी मान्यता प्राप्त यूनिवर्सिटी से मैनेजमेंट कोर्स की पढ़ाई करें तो हमें बहुत अच्छी कंपनियों में भी जब मिलती है किंतु हम मात्र डिग्री या डिप्लोमा के लिए एमबीए कर लेते हैं और उसे डिग्री से बैंक की सर्विस कर लेते हैं और अपने उद्देश्य को सीमित कर लेते हैं अतः मेरा छात्र-छात्राओं से विशेष कर अनुग्रह है जब हम सेकेंडरी एजुकेशन करने के बाद उच्च शिक्षा की ओर आगे बढ़ते हैं तो हमें लक्ष्य आधारित विषय चुनकर ही पढ़ाई करना चाहिए।


PostImage

Arvi Wardha News

March 6, 2024   

PostImage

आर्वी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक पुतड्यासाठी दिले उपविभागीय अधिकारी …


आज दिनांक ०५/०३/२०२४ मंगळवारला मा. उपविभागीय अधिकारी साहेब आर्वी जि. वर्धा यांना आर्वी शहरात विश्वरत्न भारतरत्न संविधानाचे शिल्पकार प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभाण्यासाठी जागा मंजूर करण्यासाठी आज निवेदन दिले. मागील अनेक वर्षापासून महामानव विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सार्वजनिक पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जागेच्या संदर्भात शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. परंतु याकरिता खूप विलंब होत असल्यामुळे जागेचा प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा. याकरिता एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. जेणेकरून या अत्यंत महत्वाच्या जागेच्या प्रश्नाकरिता शासनाचे तसेच संबंधीत अधिका-यांच लक्ष वेधण्याकरीता नम्रपणे निवेदन सादर करण्यात आले. करिता या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून विनाविलंब प्रश्न सोडवियात यावी ही विनंती केली व प्रा. पंकज वाघमारे, ओमप्रकाश मनवर ( पाटील ) सिद्धार्थ शेंद्रे,सुखदेव नंदागवळी, रहुपाल नाखले, बाळाभाऊ जगताप, दशरथ जाधव, दर्पण टोकसे, प्रवीण काळे , अमर मेहरे , दीपक ढोणे, ज्ञानेश्वर राठोड, नितीन आष्टीकर, सूरज मेहरे, सुरेश भीवगडे, सुजित भिवगडे, विनोद पायले , शुभांगी भिवगडे , प्रमोद चौरपगार, किरण कोल्हे 

सुरज पखाले संदीप दहिवाडे ओम प्रकाश पाटील पवन जगम गौतम मेश्राम संजय राजू वासनी गजानन वावरे आदेश धनके संकेतुल सुजित भिवगडे गोपाल महाराज निरंजन पाटील सचिन पाटील अनंता झाडे अभिषेक देवगडे अक्षय भगत ताराचंद प्रशांत म्हात्रे सुमित धनकेय हंसपाल भगत आकाश सौदागर तेजस वानखडे छत्रपती घोडे गजू चावरे मनिराम काळबांडे मोहन कांबळे जाधव मामासाहेब राजेश मोरे पवन खेडकर भीमराव धनगर अजय वाघमारे हंसराज तावडे संदीप आढाव पंकज वाघमारे रवींद्र खंडारे राजेंद्र कॉलनी मंगेश काळबांडे संदेश डांबरे विजय घोडके प्रशांत कांबळे राजेश वाघमारे राजेश खंडारे विकास भेंडे भीमराव गोपाळे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निर्माण व देखरेख समिती आर्वी व आंबेडकरी विचारांचे अनुयायी


PostImage

Ujjwala kale

Feb. 25, 2024   

PostImage

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलींचा मृत्यू


CM Convoy Car Accident : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सरकारी गाडीचा मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील गोसाईगंजच्या अर्जुनगंजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्याशी संबंधित वाहनाचा अपघात झाला.अपघातात जखमी झालेल्या 11 जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र यादरम्यान एक महिला आणि एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला.

 

लखनऊमध्ये अर्जुनगंजमध्ये शनिवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यासमोर परिस्थितीची पाहणी करत असलेले अ‍ॅन्टी डेमो वाहन काही प्राण्यामुळे रस्त्यावर उलटले. यामध्ये पाच पोलिसांसह रस्त्यावर तिथे उपस्थित असलेले 11 जण जखमी झाले. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री योगी आदित्यान यांनीही दखल घेतली आहे.

 

शनिवारी रात्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या ताफ्यासह प्रवास करत असताना त्यांच्या ताफ्यापूर्वी रस्त्याची तपासणी करत असलेल्या अ‍ॅन्टी डेमो कारचा अपघात झाला. या अपघातात 5 पोलिसांसह एकूण 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना आधी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना इतर रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी ट्रॉमा सेंटरमध्ये अपघातातील जखमींना पाहण्यासाठी पोहोचले होते. मात्र जखमींपैकी एक महिला आणि एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई आणि योग्य उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

कसा झाला अपघात?

 

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचा ताफा जाण्यापूर्वी या अ‍ॅन्टी डेमो कार जात होत्या. त्यावेळी रस्त्यात श्वान आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात एक गाडी रस्त्यावर उलटली. ही गाडी अहिमामौ चौकाजवळ इंटरसेप्टरच्या मागून जात होती. मारी माता मंदिराजवळ अचानक कुत्रा इंटरसेप्टरखाली आला. इंटरसेप्टरने पाठीमागून येणाऱ्या गाडीला इशारा केला मात्र वेग जास्त असल्याने ती नियंत्रणाबाहेर गेले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन गाड्यांवर उलटली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले काही पादचारी जखमी झाले. या गाडीत असणारे पोलिसही जखमी झाले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अन्य कोणत्याही वाहनाचे नुकसान झाले नाही.

 

दरम्यान, या अपघातातील जखमी प्रिया (14) आणि नीलम (35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींमध्ये पोलीस कर्मचारी शिवम यादव, अवध नारायण, राम सिंग, विजय प्रताप यादव, मोहम्मद शमीम आणि विजय कुशवाह यांचा समावेश आहे. कार्तिक, हसनैन, अमशा सिद्दीकी, शहनाज, खालिद आझम आणि सुशीला यांच्यासह इतर वाहनातील प्रवासी जखमी झाले.

 

अ‍ॅन्टी डेमो कार म्हणजे काय?

 

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दोन किमी आधी जिल्हा प्रशासनाच्या अ‍ॅन्टी डेमो कार पुढे निघतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यात बोलेरो डेमा कार होती. या बोलेरो कारच्या समोरून एक इंटरसेप्टर वाहन जात होते. इंटरसेप्टर हे वाहन आहे जे ताफ्याच्या अग्रभागी असते. ते रडार आधारित कॅमेरा सारख्या उपकरणांनी सुसज्ज असते आणि मागे येणाऱ्या वाहनांना सतर्क करते.


PostImage

Ujjwala kale

Jan. 23, 2024   

PostImage

रेल्वेचा प्रवास आणखीच सुरक्षीत,फायर डिटेक्शन सिस्टीम कार्यान्वित.


नागपूर: आगीसारख्या दुर्घटनांपासून रेल्वे गाड्यांचे संरक्षण करण्यासाठी मध्य रेल्वेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार, २०२३-२४ मध्ये ११ पॉवर कारमध्ये फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे.या सिस्टममुळे आगीचा धोका टाळणे शक्य होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

 

गेल्या काही वर्षांत रेल्वे गाड्यांमध्ये आग लागून मोठी हानी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्या टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांमधून ज्वलनशील पदार्थ आणि साहित्याची वाहतूक करण्यावर बंदी घातली असून, त्याला न जुमानणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याचा पवित्राही घेतला आहे.

 

तरीसुद्धा अनेक जण लपून छपून गाड्यांमधून ज्वलनशील पदार्थांची आणि सिलिंडर तसेच अन्य साहित्याची वाहतूक करतात. ते लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आता रेल्वे गाड्यांना आगीच्या घटनांपासून संरक्षण देण्यासाठी फायर डिटेक्शन ॲन्ड सप्रेशन सिस्टीम कार्यान्वित केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत एकूण १४३ पॉवर कार्सना फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम लावण्यात आली आहे. गाड्यांचे डबे आणि आईसीएफ पॉवर कार्समध्ये नमूद फायर सेफ्टी सिस्टीम बसवण्यात आली आहे.

 

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये, डिसेंबर-२०२३ पर्यंत ५०० वातानुकूलित डब्यांमध्ये धूर शोधण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय सर्व नॉन-एसी कोचमध्ये अग्निशामक उपकरणे लावण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे गाड्यांचे सुरक्षित संचलन करण्यास मदत होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.


PostImage

Ujjwala kale

Jan. 23, 2024   

PostImage

15 किलो सोने,18 हजार हिरे ,केवळ 12 दिवसांत तयार झाले …


विधीपूर्वक अभिषेक

 

22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याने 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. सोमवारी रामलल्लाला पूर्ण विधीपूर्वक अभिषेक करण्यात आला.सुबक मूर्ती

 

प्रभू श्री रामाची सुंदर, सुबक मूर्ती बघून सगळ्यांचे डोळे समाधानाने भरून आले.आकर्षणाचा विषय

 

अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यात अजून एक आकर्षणाचा विषय होता तो म्हणजे रामलल्लाच्या मूर्तीवरील दागिने.अलंकार आणि वस्त्र

 

रामलल्ला पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेल्या त्यांच्या स्वरूपावर आधारित अनेक दिव्य अलंकार आणि वस्त्रांनी सजवले गेले आहे.दागिने बनवण्यासाठी शास्त्राचा आधार

 

अध्यात्म रामायण, श्रीमद वाल्मिकी रामायण, श्री रामचरितमानस आणि आळवंदर स्तोत्र यांचे संशोधन आणि अभ्यास करून आणि त्यात वर्णन केलेल्या श्रीरामाच्या शास्त्राधारित सौंदर्यानुसार रामलल्लाचे दागिने तयार करण्यात आले आहेत.15 किलो सोने अन् 18 हजार हिरे

 

प्रभू रामाचे दागिने बनवण्यासाठी 15 किलो सोने आणि सुमारे 18 हजार हिरे आणि पाचू वापरण्यात आले आहेत.

 

14 दागिने

 

टिळक, मुकुट, 4 नेकलेस, कमरबंद, दोन जोडे पायल, विजय माला, दोन अंगठ्या असे एकूण 14 दागिने तयार करण्यात आले आहेत. हे दागिने अवघ्या 12 दिवसांत तयार करण्यात आले आहेत.लखनौच्या ज्वेलर्सने दागिने तयार केले

 

हे दागिने तयार करण्याची जबाबदारी लखनौच्या हरसहयमल श्यामलाल ज्वेलर्सकडे सोपवण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्री राम मंदिर ट्रस्टने 15 दिवसांपूर्वी ज्वेलर्सशी संपर्क साधला होता.


PostImage

Ujjwala kale

Jan. 13, 2024   

PostImage

क्रिकेट नंतर फुटबॉल मध्ये ऑस्ट्रेलिया नेभारताची वाट अडवली एक चूक …


फुटबॉलमध्ये गेल्या काही दिवसात भारताने बऱ्यापैकी प्रगती केली आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींची संख्याही वाढली आहे. असं असताना एएफसी एशियन कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या पदरी निराशा पडली.पहिल्या सत्रात जोरदार चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे पहिला हाफ 0-0 ने बरोबरीत सुटला होता. त्यानंतर दुसऱ्या सत्रात गुरप्रीत सिंग संधूची चूक भारताला चांगलीच महागात पडली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात आघाडी घेण्यात यश मिळालं. दुसऱ्या हाफमध्ये पास रोखण्याच्या प्रयत्नात, गुरप्रीतने नकळतपणे जॅक्सन इर्विनकडे चेंडू पास केला. त्याने त्या संधीचं सोनं केलं आणि पेनल्टी क्षेत्रातून गोल पोस्टवर चेंडूवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे पहिला गोल करण्यात यश आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला आक्रमक पवित्रा सुरुच ठेवला.

ऑस्ट्रेलियाने पहिला गोल मारल्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर आली. 73 व्या मिनिटाला दुसरा गोल करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. पेनल्टी एरियामध्ये रिले मॅकग्रीचा शानदार पास आणि जॉर्डन बॉसला पहिल्या फटका मारण्यात यश मिळालं. त्याने सहजरित्या त्याचं गोलमध्ये रुपांतर केलं. त्यामुळे 2-0 ने आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने विजयाची वाट धरली. दुसरीकडे, टीम इंडियाला कमबॅक करणं कठीण गेलं. दुसरीकडे, पूर्वार्धात भारताचा कर्णधार सुनील छेत्री गोल करण्याची संधी चालून आली होती. पण त्याच्या हेडरने गोल मारण्याचा प्रयत्न केला. पण लक्ष्य थोड्या फरकाने चुकले.

 

टीम इंडियाला आता स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी साखळी फेरीतील उर्वरित दोन्ही सामने जिंकणं आवश्यक आहे. 18 जानेवारीला उजबेकिस्तानशी आणि 23 जानेवारील सिरियाशी सामना होणार आहे. त्यानंतर 21 मार्चपासून पुन्हा एकदा टीम इंडिया वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने खेळणार आहे.

 

दोन्ही संघांची सुरुवातीची प्लेइंग इलेव्हन

 

भारताची प्लेइंग इलेव्हन: गुरप्रीत सिंग संधू(गोलकीपर), राहुल भेके, सुभाषीष बोस, संदेश झिंगन, सुरेश सिंह वांगजम, मनवीर सिंह, सुनील छेत्री (कर्णधार), लल्लियाझुआला छांगटे, ललेंगमविया रालटे, निखिल पूजारी, दीपक टांगरी.

 

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: मॅटी रायन(कर्णधार) (विकेटकीपर), केय रोलेस, मार्टिन बॉयल, कोन्नोर मेटकाफ, मिच ड्यूक, एझिज बेहिच, किनू बॅकस, हॅरी सौत्तर, जॅकसन इर्विन, क्रेग गुडविन, गेथिन जोन्स.


PostImage

news today24.Com.

Jan. 11, 2024   

PostImage

लातूरची येळवस... अन वलग्या वलग्या सालम पलग्या


 

 

      लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात उद्या गुरुवारी  दि. 11 जानेवारी रोजी समुद्राला जशी पाण्याची भरती येते... तशी शेताशेतात माणसाची भरती येते... कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे येळवस म्हणजे वेळाआमावस्या...हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा...11 जानेवारी रोजी अख्ख्या लातूर जिल्ह्यातील शेतात भरेल यावेळी कोरोनाचे संकटही नाही  जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक सुट्टीही जाहीर केली आहे. त्यामुळे ही वेळामावस्या मोठ्या धुमधडक्यात साजरी होणार आहे...त्या विषयी महाराष्ट्राला समजावे म्हणून हा लेख प्रपंच...!!

कसा असतो सोहळा…!! 
वेळाआमावस्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा चवळी भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो...आणि वेळाआमावस्या पहाटे घराघरात चूल पेटते... बेसनपिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या  ताकाच्या पाण्यात वर उल्लेखलेले उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी... म्हणजे भज्जी... ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी, मी आजपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो  वेगवेगळे पदार्थ खाले पण भज्जीसारखी अफलातून चव कशाला म्हणजे कशाला नाही ...या डीशची तुलना कोणतेही पंचतारंकित हॉटेलही करु शकणार नाही.... या बरोबर दिले जाणारे अंबील म्हणजे तर राज दरबारी असलेले सगळे पेय फिके पडावेत असे...चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेल हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा होते ते अंबिल काही जणांचे तोंडही सुजतात दुस-या दिवशी जादाचा डोस झाल्यामुळे भल्या थोरल्या भाकरी...... गव्हाची खीर एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावरुन शेतावर निघतो. एका शेतात खाल्लेली येळवस दुसऱ्या शेतात जाऊन खाण्यासाठी ते जिरावं म्हणून प्रत्येक कोपीच्या पुढे झोका बांधला जातो...!!

काय आहे परंपरा
   अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो  रब्बी पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न  त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.
भारतीय व्दिपकल्पात सिंधु संस्कृती पासून नदीचे जल पुजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे.  गंगा ,यमुना , गोदावरी , सरस्वती ,नर्मदा ,सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधु )  भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंदु मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्त सिंधुचे प्रतिक म्हणून पुजल्या जावू लागले. विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे तीला लातूर जिल्ह्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी, सहारा देणारी ,पाणी पाजणारी. याच आसराची पुजा वेळा आमवस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेड्यांची कोप करुन मनोभावे पूजा करून लक्ष्मीला ब्लाऊज पीसने ओटी भरून नैवेद्य दाखवला जातो. परंपरा म्हणून खोपेला ५ फेऱ्या मारतात आणि “वलग्या वलग्या सालम पलग्या” असे म्हटले जाते. हे कन्नड वाक्य आहे. कन्नडात “वलगे वलगे सालम पलगे” असा उच्चार होतो. त्याचा अचूक अर्थ “वांग्याची भाजी आणि पोळी तुम्हाला(लक्ष्मीला) अर्पण करतो. तुम्ही आमच्यावर वर अनुग्रह करा.” असा होतो.
   सकाळी पूजाकरुन आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते..... जेवण करताना आपण किती खातोय याचे भान राहत नाही. प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा अस्वाद घेण्याचा आग्रह होतो, तो टाळता येत नाही, पोटाला तडन लागते. जेवणाच्या पात्रावरुन उठून झोक्यावर जावून झोका खेळायचे खालेले अन्न पचवण्यासाठीचा प्रयत्न करायचा.. आणि पुन्हा दुसऱ्या कोपीवर जाऊन जेवायचे...एकेकाळी १२ बलुतेदार ,आठरा आलुतेदार यांनाही आग्रहाने जेवायला बोलवून हे सगळे खावू घातलं जात. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभरा याच्या वावराला तो पेटवून रान ओवाळून काढायचे, आणि तोच टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा मोठी आग करुन ती शमली की तीच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायचे. असा मनमोहक सण आहे. त्यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघून जायचे..... ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. मोठा घोड्याचा बाजार ( माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या सह अनेकांचे दैवत ), गाढवांचा बाजार , सगळ्या भटक्या जमातींची पंचायत यावेळी इथे भरते. देशभरातले तृतीयपंथी दर्शनाला येतात (तृतीयपंथांचे माळेगाव अशीही ओळख ) ,तमाशाचे मोठ मोठे फड..... यामुळे या जत्रेला पुरुष मंडळीच्या दृष्टीने ख-या अर्थाने चांगभलं असे ..... असा हा सण आणि त्याची परंपरा आहे आजही मोठे हौसेनी सांभाळली जाते... चला तर मग येळवस साजरी करू या.. महान परंपरेचा वारसा जपू या


PostImage

Ujjwala kale

Nov. 27, 2023   

PostImage

श्वेता बच्चन आईवडिलां सोबत मुंबईत राहते समोर आले त्याचे मोठे …


मुंबई : सध्या मनोरंजन क्षेत्रात ऐश्वर्या बच्चनच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. अनेकजण ही बातमी खरी असल्याचं म्हणतायेत तर अनेकांनी मात्र या बातमीला अफवा असल्याचं म्हटलं आहे. अद्यापतरी बॉलिवूडच्या या जोडीने यावर मौन बाळगलंय.सध्या चाहते या दोघांच्या वक्तव्याची वाट पाहत आहेत. मात्र या सगळ्या दरम्यान नुकताच बीग बी यांनी त्यांची लेक श्वेता बच्चनला त्यांचं पहिलं घर म्हणजेच प्रतीक्षा बंगला भेट केला आहे. रिपोर्ट्सनुसार, हे देखील समोर आलं आहे की एकूण 16,840 स्क्वेअर फूट मोठा असा हा बंगला आहे. या बंगल्याची किंमत ही 50.63 कोटी आहे. इकोनॉमिक टाइम्स' नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, 8 नोव्हेंबर 2023 ला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी साइन केली होती आणि त्यांनी स्टॅम्प ड्युटीसाठी तब्बल 50.65 लाख रुपये खर्च केले.

 

पण या सगळ्या बातम्यांदरम्यान अजून एक चर्चा आहे ती म्हणजे श्वेता बच्चनचा घटस्फोट. एकीकडे ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना मात्र श्वेताचाही घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. आणि तिच्या चर्चेच कारण म्हणजे ती मुंबईत राहते. श्वेता सासरी दिल्लीत राहत नाही. श्वेताचा पती बिझनेसमन आहे. त्यामुळे तो दिल्लीत राहतो. सुरुवातीच्या काळात तिची मुलं लहान असल्या कारण्याने तिला तिच्या करिअवर फोकस करता आलं नाही. पण आता तिच्या आवडत्या क्षेत्रात ती काम करतेय. श्वेता सासरी राहत नाही, यामागचं कारण तिचं करिअर आहे असं बोललं जातं

 

काही काळापूर्वी अशा अफवा होत्या की श्वेता व निखिल बऱ्याच वर्षांपासून वेगळे झाले आहेत, पण त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. पण निखिल व श्वेता यांचा घटस्फोट झालेला नाही. श्वेता फॅशन डिझायनर व लेखिका आहे. श्वेता व निखिल यांचे प्रोफेशन खूप वेगळे आहेत. त्यामुळे ती मुंबईत राहते व तिचे पती दिल्लीत राहतात. एकीकडे ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाची बातमी ऐकून चाहते हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे श्वेताच्याही घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता बच्चन कुटूंब या सगळ्यावर काय प्रतिक्रीया देतंय याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याने तिचा 50 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्तानं जगभरातून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्तानं अभिषेकनं सोशल मीडियावर तिचा एक मोनोक्रॉम फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. अभिषेकनं शेअर केलेल्या फोटोत तो नव्हता आणि त्या फोटोमुळे देखील त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.


PostImage

Ujjwala kale

Nov. 24, 2023   

PostImage

नोटांचा डोंगर ..... कारमध्ये सापडलेले पैसे पाहून पोलिसांनाही बसला धक्का


Telangana Election 2023 : तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगही आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना दिसत आहे.अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तेलंगणा पोलिसांनी एका गाडीतून इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे जप्त केले की त्यांना ते नेण्यासाठी ट्रॉलीचा वापर करावा लागला.

 

तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याचदरम्यान, गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान तेलंगणा पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या रोख रकमेबाबत कार चालकाकडे चौकशी केली असता ते या रोख रकमेचा कोणतीही देऊ शकले नाहीत. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना वाहनांच्या तपासणीदरम्यान, एका कारमध्ये दोन सुटकेस आढळून आल्या. त्या उघडून बघितल्यावर पोलिसांना धक्काच बसला. सुटकेसमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड ठेवण्यात आली होती. पोलिसांनी रोख रक्कम जप्त करून तिघांनाही ताब्यात घेतले आणि रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द केली.

 

तेलंगणा राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या वाहन चेकपोस्टवर ही घटना घडली. चिरेक इंटरनॅशनल स्कूलजवळील मस्जिद बांदा रोडवरील बोटॅनिकल गार्डन येथे पोलिसांनी मारुती ब्रेझा कार अडवली होती. त्यावेळी तपासणी केली असता त्यांना कारमध्ये असलेल्या दोन सुटकेसमध्ये 5 कोटी रुपये रोख सापडले. पोलिसांनी याप्रकरणी तीनजणांना अटक केली. दुग्याला संतोष राव, मुत्याला नरेश आणि चीती संपत राव अशी अटक केलेल्यांची नावे असून हे तिघेही व्यावसायिक आहेत. तिघेही योग्य कागदपत्रांशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेची वाहतूक करत होते.

 

त्याआधी रचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या हयात नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.


PostImage

Ujjwala kale

Nov. 24, 2023   

PostImage

H9N2 :चीनमधल्या नविन वायरसचा भारताला किती धोका?आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरणं


H9N2 China Cases : चीनच्या उत्तर भागात नव्याने आढळून येत असलेल्या H9N2 व्हायरसची प्रकरणे आणि श्वसनाच्या आजारासंबंधी झालेल्या उद्रेकावर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत शुक्रवारी स्पष्टीकरण दिलं.


PostImage

S R sawsakde

Aug. 26, 2023   

PostImage

तांबेगढी (मेंढा ) येथे गुणवंत विद्यार्थी च्या हस्ते ध्वजारोहण !


तांबेगढी (मेंढा ) येथे गुणवंत विद्यार्थी च्या हस्ते ध्वजारोहण !

 

ग्रामपंचायत ने घेतला निर्णय

 

सिंदेवाही :

 

तालुक्यातील पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येणाऱ्या तांबेगढी (मेंढा ) मधील ग्रामपंचायत जुन्या चाली रित्या नियमाना झुगारून कांतिकारी निर्णय घेत स्वतांत्रदिनाच्या दिवशी १२ च्या परीक्षेत गावातून प्रथम येणाऱ्या विध्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला. गावातील १२ वी परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांचा गुनपत्रिका मागविण्यात आल्या, त्या मध्ये कु. लक्ष्मी सुनिल राऊत या विध्यार्थिनीला गावामधून सर्वात जास्त टक्केवारी असल्याने ग्रामपंचायत मधील ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला आणी सत्तेत जो पर्यत आहोत तो पर्यंत गावाच्या विकासासाठी असेच निर्णय घेऊ जेणेकरून गावातील शिकत असणाऱ्या विध्याथी ना अभ्यासाची जिद्द लागेल व जीवनात यशस्वी होण्याकरिता प्रयत्न

 

करतील. या साठी ग्रामपंचायत मधील पदाधिकारी सुमित वालदे सरपंच, विनोद किचक उपसरपंच, धनराज गुरुनुले, प्रियंका चौधरी, अर्चना दलांजे, अनु उईके, रवी दुधे, सदस्यगन, श्रीगिरवार ग्रामसेवक, रेखा वाढणकर पोलीस पाटील, व गावातील नागरिक तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विध्यार्थ्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला,


PostImage

Ritik

Aug. 24, 2023   

PostImage

चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; लातूरकरांसाठी अभिमानाची बाब


लातूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान ३ मोहिमेला खूप मोठे यश मिळाले. विक्रम लँडर हे यान चंद्राच्या दक्षिण गोलार्धात यशस्वीपणे लँड करण्यात आले. या अभिमानास्पद कामगिरीत लातूर जिल्ह्यातील नदी हत्तरगा (ता.निलंगा) येथील मूळचे रहिवासी असलेले उमेश रमेश स्वामी या शास्त्रज्ञाचा सहभाग राहिला आहे. 


PostImage

My Guide

Aug. 5, 2023   

PostImage

आख आई है 5 उपाय


Ankheye
Caption
Health
Caption

1)ए  बहुत जल्दी फालने वाला वायरस है.एलर्जी बैक्टीरिया के कारण होता है.2)बारिश के कारण इम्युनिटी बढ़ती है .इससे ज्यादा पसीना आता है.3)आख लालसर होना, आख से पानी आना, आख को खाज आना, आखो में चिकटापन, सर्दी खोखला, ताप आना.4)हर 1 घंटे आंख को धोना है हाट को धोते रहें या गॉगल्स का उपयोग करें।5)

 

 

 

 आख को जादा हाट नहीं लगाया या रुमाल, तवेल, चश्मा का उपयोग कर।एक दूजे के आँखों में आँखें नहीं मिलाये और आँखों को रुमाल से साफ करते रहो.ज्यदातर बच्चों को होता है या काला चश्मा पहनने गरम पानी पिए.साफसफाई राखे.ये 6,7 दिन रहता है सफाई राखे.अपना तवेल अलग से राखे.धूप में ना जाए.

Khushraheneketarikeye
Caption

 

एंटीबायोटिक क्रिम लगायी रात को।आख लालसेर होना.आंख से पानी आना..